Ad will apear here
Next
कर्मठकथा
कुटुंबातील एखाद्या सदस्यावर अनंत अत्याचार केले जात असल्याचे प्रसंग आपण चित्रपट, मालिकांमधून पाहतो, कथा-कादंबऱ्यांमधून वाचतो; पण असे प्रत्यक्षात असते का, या प्रश्नाचे उत्तर सुगंधा चितळे-पांडे यांची ‘कर्मठकथा’ हे आत्मकथन वाचल्यावर मिळू शकेल. 

व्यसनी वडिलांकडून क्षुल्लक कारणावरून लेखिकेच्या आईचा खून होतो. ते तुरुंगात गेल्यानंतर साडेतीन वर्षांची चिमुकली आणि सहा महिन्यांची तिची बहिण अनाथ होतात. तीन वर्षे अनाथाश्रमात घालविल्यानंतर त्या दोघी काकांच्या कोंडवाड्यात येतात. समाजात उच्च स्थान असलेल्या काकांच्या कृष्णकृत्यांचा पाढा यात वाचला आहे. कर्मठपणाच्या आडून पाप करण्यात काका व त्यांच्या कुटुंबाला कधीच गैर वाटत नसे. घरात कामाचा गाडा वाहत असूनही पुतण्यांना मारहाण, कुत्सित बोल चुकत नसे. लहान वयात लग्न लावून दिल्यावरही लेखिकेवरील संकटांची मालिका अखंडित राहते. पुढे मैत्रिण व तिच्या पतीच्या मदतीने थोडे सुखाचे दिवस येतात; मात्र दुसऱ्याच्या कुशीत दिलेल्या आपल्या छकुलीच्या आठवणीचे कढ तिला येतच राहतात.

पुस्तक : कर्मठकथा
लेखक : सुगंधा चितळे-पांडे
प्रकाशक : पब्लिक स्पीकर
पाने : १९२ 
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZWNCC
Similar Posts
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’ ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून..
अगा जे घडलेची नाही श्रीराम बापट यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवन मानसशास्त्रीय पद्धतीने समोर आले आहे. पौगंडावस्थेतील तरुणांची मनोवस्था ते श्रद्धा-अंधश्रद्धापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे विषय जसे सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात, तसेच मानवी मनाची गुंतागुंत म्हणून! एकूण २१ कथांचा हा संग्रह आहे.
शंभल: एखादा पुराणपुरुष अचानक आपल्यासमोर येऊन उभा राहिला, तर काय होईल? असेच काहीसे मनुचे झाले. त्यासाठी मूळ कथाच वाचायला हवी. पौराणिक कथेला वेगळ्या स्वरुपात समोर आणण्याचा प्रयत्न दर्शन देसले यांनी या पुस्तकातून केला आहे. मनु हा या कथेचा नायक. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय. संस्कृतीचा शोध घेता-
शिन्झेन किस जपानमधील विज्ञानकथा लेखक शिनइची होशी यांच्या कथा या अद्भुत असतात. वेगळे कथानक आणि धक्कादायक शेवट हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य. यातील निवडक कथा निस्सीम बेडेकर यांनी ‘शिन्झेन किस’ या संग्रहातून मराठी वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. यात १८ कथा अगदी छोट्या तीन-चार पाणी आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language